Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

म्हैसाळमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; तिघे गंभीर जखमी

 


म्हैसाळ (ता. मिरज): म्हैसाळ येथील शेडबाळ रोड मळा भागात गॅस गळतीमुळे सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन एकाच कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना ५ मे रोजी सकाळी सुमारे ५:३० वाजता घडली.

स्फोटात सुर्यकांत वनमोरे (वय ४४), मयुरी वनमोरे (वय ३६) आणि प्रिया वनमोरे (वय १३) हे तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तात्काळ उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, रात्रीच्या काळात गॅस सिलेंडरमधून गळती झाल्यामुळे घरात गॅस साचला होता. सकाळी सुर्यकांत वनमोरे हे अंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी गॅस सुरू करत असताना अचानक भीषण स्फोट झाला. स्फोट इतका जबरदस्त होता की घराच्या भिंती, पत्रे उडून गेले तसेच घरातील फर्निचर, कपाट, फॅन व इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. म्हैसाळ पोलीस औटपोस्टचे बीट अंमलदार बळीराम पवार देखील घटनास्थळी उपस्थित होते. सध्या पुढील तपास सुरू आहे.




Post a Comment

0 Comments