Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

आदर्श सी.बी.एस.ई मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा.

विटा : लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सी. बी. एस. ई.मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून प्रशालेचे प्राचार्य डॉ.राजेश ओहोळ यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आदर्श वैद्यरत्नम चे आयुर्वेदाचार्य डॉ. प्रणिश उपस्थित होते.

      या कार्यक्रमाचे स्वागत व  प्रास्ताविक राजेंद्र कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी मनीषा रकटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रशालेचे प्राचार्य  डॉ. राजेश ओहोळ म्हणाले की, आजच्या महाराष्ट्र दिनाबरोबर १मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून ओळखला जातो. कामगारांच्या हक्कासाठी आणि न्याय वेतनासाठी सुरू झालेल्या चळवळीचा हा स्मरण दिन आहे. त्याचबरोबर  १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला यश प्राप्त होत महाराष्ट्र राज्याचे स्वप्न पूर्ण झाले. जगातला हा सर्वात शांतताप्रिय, सुरक्षित, सहिष्णू प्रदेश, संतांची भूमी  म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग, कला, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारा आमचा महाराष्ट्र आहे. चित्रपटसृष्टी असो किंवा उद्योग क्षेत्र असो देशभरातील लोकांना रोजगार मिळवून देतो तो आमचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस हा स्वाभिमानी आहे.तसेच सर्वांना सामावून घेणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. निसर्ग संपत्तीचे वरदान लाभलेला सुजलाम,सुफलाम असलेला बुद्धिजीवी आणि विवेकी जनतेचा आमचा महाराष्ट्र आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे ते म्हणाले.

    महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या संयुक्त कार्यक्रमाचे औचित्य साधून  संस्थेचे कार्यकारी संचालक पी. टी. पाटील त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या  व या कार्यक्रमासाठी मोलाचे असे मार्गदर्शन मिळाले.

           या कार्यक्रमासाठी प्रशालेचे उपप्राचार्य संतोष मेनन, ब्लूमिंग बर्ड च्या इन्चार्ज भाग्यश्री गायकवाड, पर्यवेक्षिका राजश्री चव्हाण, पर्यवेक्षक किरण कांबळे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सुरक्षा विभागाचे  सर्व पदाधिकारी व कर्मचारी, आदर्श वैद्यरत्नम हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.

      या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन राजेंद्र कांबळे यांनी केले. आभार शुभांगी जाधव यांनी मानले.


Post a Comment

0 Comments