Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राम सासणे यांचे अमरण उपोषण यशस्वी; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

 1 मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मानधन व बदली कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र राज्याचे जिल्हाध्यक्ष राम सासणे यांनी सांगलीत अमरण उपोषणाची सुरूवात केली होती.

महानगरपालिकेतील कर्मचारी वर्गाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेले हे आंदोलन दोन मे रोजी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

सासणे यांच्या उपोषणाला पुरुष व महिला कर्मचारी वर्गाने मोठा पाठिंबा दर्शविला होता. दोन दिवस चाललेल्या या आंदोलनामुळे महापालिका प्रशासनावर दबाव निर्माण झाला होता. अखेर सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांनी मागण्यांवर कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यांनी पुढील दोन दिवसांत आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठपुरावा करण्याचेही आश्वासन दिले.

सदर उपोषणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. राम सासणे यांनी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत करत, आंदोलन मागे घेतले असल्याचे स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments