राज्यभर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांची यशोगाथा समोर येत आहे. मात्र या निकालात सोलापूरमधील एका विद्यार्थ्याने अनोखा विक्रम केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
स्वामी विवेकानंद नगर, हतुरे वस्ती येथे राहणारा शेख इमरान अब्दुल्ला या विद्यार्थ्याने दहावीच्या प्रत्येक विषयात अचूक ३५ गुण मिळवत आपला निकाल ३५ टक्क्यांवर स्थिरावला आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही विषयात तो नापास झालेला नाही, पण कुठेही अधिक गुणही नाहीत. अगदी गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, मराठी, इंग्रजी – सर्व विषयांमध्ये त्याचे गुण ‘३५’ वरच थांबले आहेत.या अनोख्या निकालाबद्दल विचारले असता इमरानने हसत हसत सांगितले की, “बस्स, पास व्हायचं होतं! आणि प्रत्येक विषयात ते अचूक जमवलं.”
त्याने पुढे विज्ञान शाखेत अकरावीला प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
शेख इमरानच्या या वेगळ्या प्रकारच्या कामगिरीचे कौतुक विविध मान्यवरांकडून करण्यात येत आहे. त्याच्या आत्मविश्वासाचे आणि प्रयत्नांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
0 Comments