सांगली, दि. २० मे – पाकिस्तानचे कंबरडे मोडून ऑपरेशन सिंदूर हे भारतीय सैन्याने अत्यंत यशस्वीरित्या पार पाडले आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरात भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव केला जात असून, शिवसेनेतर्फे राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सांगली आणि मिरज विधानसभा क्षेत्रांच्या वतीने आज शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. महेंद्र भाऊ चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीची सुरुवात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्फूर्ती स्थळावर पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
रॅलीचा मार्ग राम मंदिर, पंचमुखी मारुती रोड, मारुती चौक, शिवतीर्थ, राजवाडा चौक, पटेल चौक मार्गे गणपती मंदिरापर्यंत होता. येथे देशासाठी लढलेल्या माजी शूर सैनिकांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
रॅलीच्या सांगता सभेत शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांनी मनोगत व्यक्त करत भारतीय सैन्यदल, एअरफोर्स, नौदल आणि बीएसएफचे विशेष कौतुक केले. यावेळी श्री. महेंद्र भाऊ चंडाळे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने शौर्य गाजवले. याचे आम्हाला अभिमान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मदत करून जबरदस्त तळमळ दाखवली आहे."
ते पुढे म्हणाले, "पुन्हा पाकिस्तानने जर डोके वर काढले, तर तो देशच नकाशावरून नष्ट करू अशी आमची भावना आहे."
या रॅलीमध्ये रावसाहेब घेवारे, संजय विभुते, माधवराव गाडगीळ, हरिदास लेंगरे, समीर भैय्या लालबेग, संदीप ताटे, किरण राजपूत, सुरज कासलीकर, रुक्मिणी ताई आंबिगिरे, ऋषिकेश पाटील, गजानन मोरे, दादा जगताप, प्रकाश मगर, स्वप्नील मस्कर, मोसिन मुल्ला, अविराज पवार, अशरफ कारभारी यांच्यासह शिवसेनेचे सांगली व मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, आजी-माजी सैनिक, संघटनांचे प्रतिनिधी आणि हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.
0 Comments