Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

DPDC निधीतील २ कोटींचे पेमेंट व SOP स्थगितीबाबत आयुक्तांचा मक्तेदार असोसिएशनतर्फे सत्कार

सांगली | दिनांक: २९ मे २०२५

 

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे मा. आयुक्त साहेब यांनी DPDC मधील ३०% मनपा हिस्सा म्हणून २ कोटी रुपये मक्तेदारांचे क्रमबद्ध पद्धतीने पेमेंट करून दिल्याबद्दल, तसेच १२/१२/२०२४ च्या आनामत SOP अंमलबजावणीला ३१/१२/२०२५ पर्यंत स्थगिती देण्यात आल्यामुळे, मक्तेदार संघटनांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

हा सत्कार सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मक्तेदार असोसिएशनच्या वतीने करण्यात आला असून, या प्रसंगी अध्यक्ष सुजीत काटे, संघटक प्रमुख साजिद शेख, संस्थापक अध्यक्ष सजन पाटील, तसेच सदस्य आशीष पवार, मक्तेदार अजिंक्य जाधव, नय्युम नदाफ, कय्यूम नदाफ, प्रकाश नवलाई, राहुल लाले, पी. आर. गाडे, शिवाजी जाधव, मुजम्मिल अत्तार, आकाश, महंमद शेख, साजिद जमालूदिन शेख, भोसले आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

मक्तेदार वर्गाने आयुक्त साहेबांचे व्यवस्थापन व सकारात्मक निर्णयप्रक्रियेबद्दल कौतुक करत, आगामी काळातही असेच सहकार्य लाभावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments