Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

सांगलीत कर्नाळ चौकीजवळ आढळला बेवारस मृतदेह; ओळख पटली नाही

 सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्नाळ पोलीस चौकी लगत नामदेव मंदिराजवळ एक अनोळखी बेवारस पुरुष मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस स्टेशनस्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो सांगली शासकीय रुग्णालयात पुढील तपासासाठी पाठवला आहे. घटनास्थळाच्या जवळच असलेल्या घरासमोर मृत व्यक्ती ४-५ तासांपूर्वी झोपलेला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. प्रकरणात दारूच्या नशेचा संशय व्यक्त करण्यात येत असून, अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

मृत व्यक्तीचा पोशाख पुढीलप्रमाणे आहे:

  • अंगावर गुलाबी आणि काळ्या पट्ट्यांचा शर्ट

  • काळा बनियन

  • चॉकलेटी अंडरवेअर

  • निळ्या रंगाची पॅन्ट

  • सावळा रंग, उंची अंदाजे ५.५ फूट, काळे केस व वाढलेली दाढी

  • निळ्या रंगाच्या चप्पल

कोणत्याही व्यक्तीस वरील वर्णनातील माहिती ओळखीची वाटल्यास सांगली शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, महेश गव्हाणे, शिवराज टाकळी, आकाश कोल्हापूर, राकेश शिंदे तसेच सांगली शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments