Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

उड्डाणपुलावर डंपरचा भीषण अपघात; पतीसमोर पत्नीचा जागीच मृत्यू

 पतीसोबत दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या पत्नीवर काळाने घाला घातला. भरधाव वेगाने आलेल्या काँक्रीट मिक्सर डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि.२४) सकाळी सांगलीतील विश्रामबाग उड्डाणपुलावर घडली.

मृत महिलेचे नाव पूनम गोविंद नलवडे (वय २५, रा. कवलापूर, ता. मिरज) असे असून, अपघातात त्यांचे पती गोविंद नलवडे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपरचालकाला पकडून चांगलाच चोप दिला.

पती-पत्नीचा हा दररोजचा प्रवास होता. दीड वर्षांपूर्वी विवाह झाल्यानंतर गोविंद आणि पूनम रोज सकाळी सांगलीत कामासाठी येत असत. गोविंद हे पत्नीला विश्रामबागेतील कल्लोळी रुग्णालयात सोडून पुढे आपल्या कार्यालयात जात असत.

मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास, उड्डाणपुलावरून जात असताना पाठीमागून आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात पूनम डंपरखाली आली व जवळपास ५० फूट फरफटत गेली. जागीच त्यांचा मृत्यू झाला. तर गोविंद रस्त्याच्या कडेला फेकले गेले.

अपघात पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली. काही अंतरावर डंपर थांबवून चालकाला पकडून चोप दिला. गंभीर अवस्थेतील पूनम यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी डंपरचालकाला ताब्यात घेतले असून, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या अपघातामुळे संपूर्ण नलवडे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.

Post a Comment

0 Comments