हेरवाड गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, १६ वर्षीय इंद्रायनी राजेंद्र मोहिते हिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तिने आपल्या राहत्या घराच्या हॉलमध्ये लाकडी तुळीला नायलॉनच्या ओढणीने गळफास लावून आपले जीवन संपवले.
ही घटना २२ जून रोजी सकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची माहिती विश्वजीत शंकर बिडकर (वय ३६, रा. ब्राम्हणपुरी गल्ली, कुरुंदवाड) यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दिली आहे.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणाची नोंद पोलिस नाईक राजेंद्र पवार यांनी केली असून, पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, शाळकरी वयात असे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments