Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

मुख्याध्यापक वडिलांच्या मारहाणीत बारावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; डॉक्टर होण्याचे स्वप्न अर्धवट

 साधना भोसले ही बारावीमध्ये शिक्षण घेत होती आणि डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न होते. दहावीमध्ये तिने ९५ टक्के गुण मिळवून सर्वांची मने जिंकली होती. मात्र, अलीकडे झालेल्या नीटच्या चाचणी परीक्षेत तिला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तिचे आयुष्यच धुळीस मिळाले.

तिचे वडील धोंडीराम भोसले हे स्वतः एका शाळेत मुख्याध्यापक असून, त्यांनी नीट चाचणीतील कमी गुणांमुळे साधनाला जबर मारहाण केली. नेलकऱंजी येथील त्यांच्या घरी जात्याच्या लाकडी खुंट्याने मारहाण केल्याने साधना गंभीर जखमी झाली.

अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे मारहाणीनंतरही तिला तात्काळ रुग्णालयात न नेता धोंडीराम भोसले दुसऱ्या दिवशी 'आंतरराष्ट्रीय योग दिना'च्या कार्यक्रमासाठी शाळेत निघून गेले. घरी परतल्यावर त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी धोंडीराम भोसले याला पोलिसांनी अटक केली आहे. एक हुशार विद्यार्थिनी केवळ वडिलांच्या अपेक्षांचा बळी ठरली, हे समाजमनाला हादरवून टाकणारे आहे.

Post a Comment

0 Comments