आंतरराष्ट्रीय योग २१ जून दिनाचे औचित्य साधून मेरिटोरियस पब्लिक स्कूल, तिरोडा येथे योग दिन अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.३० वाजता करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून संस्थेचे संचालक मुकेश अग्रवाल उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत प्राणायाम, सूर्यनमस्कार व इतर योग क्रियांचा सराव करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.
अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, "जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग पैसा नव्हे, तर निरोगी शरीर व मन आहे. यासाठी दररोज फक्त पाच ते दहा मिनिटे सूर्यनमस्कार व योगासनांचा सराव प्रत्येकाने केला पाहिजे."
या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. योग दिनाच्या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन दिव्या तिवारी व प्रियांका शुक्ला यांनी केले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे प्राचार्य प्रफुल्ल तिवारी यांनी सर्वांचे आभार मानले व विद्यार्थ्यांना दररोज योग करण्याचे महत्त्व पटवून देत नियमिततेचे पालन करण्याचे आवाहन केले.
0 Comments