Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून वारकरी तालावर जागतिक योग दिन उत्साहात साजरा!

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने २१ जून रोजी जागतिक योग दिन वारकरी तालाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महानगरपालिकेच्या प्रमुख कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, सांगली येथे करण्यात आले होते, तर अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठीचा विशेष योग सत्र आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल, सांगली आणि मिरज हायस्कूल, मिरज येथे संपन्न झाले.

या पाऊण तासाच्या योग कार्यक्रमात महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय स्टाफ, शिक्षण मंडळ, अग्निशमन विभाग आदींनी सहभाग घेत योगासने आणि भक्‍तीयोग यांचा अनुभव घेतला.

यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये उपायुक्त स्मृती पाटील, विजया यादव, अश्विनी पाटील, तसेच शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, क्रीडाधिकारी स्नेहांकित वरुटे, शिक्षण अधिकारी आकाश खेडकर, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, जलनिसारण अभियंता चिदानंद कुरणे, आणि इतर अधिकारी व विभागप्रमुख यांचा समावेश होता.

महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर दीपक चव्हाण, ज्योती सर्वदे, अमजद जेलर यांच्यासह भाजप नेत्या रूपाली अडसुळे आणि प्रेमा मालपाणी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

कार्यक्रमात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने मनःशांतीसंबंधी विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन उपायुक्त अश्विनी पाटील यांनी तर आभारप्रदर्शन उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments