Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

अनैतिक संबंधातून खून! सांगलीत खळबळजनक प्रकरणाचा उलगडा, दोन आरोपी अटकेत

 सांगली – सांगली शहरातील १०० फुटी रोड, पत्रपारनगर येथे दिनांक ५ जून २०२५ रोजी सकाळी साडेसहा वाजता घडलेल्या खळबळजनक खुनाच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत पर्दाफाश केला आहे. अनैतिक संबंधातून खुन करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, याप्रकरणी नुजाहिय शेख व जय सूरज पाटील या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मयत महेश प्रकाश कांबळे (वय ४०, रा. आंबा चौक, इंदिरा हौसिंग सोसायटी, कुपवाड रोड, सरायंतनगर, सांगली) यांचा खून पोट व डोक्यावर धारदार हत्याराने वार करून करण्यात आला होता. ही घटना माजी गुन्हेगार फिरोज ऊर्फ बडे शेख यांच्या खुनाशी संबंधित असल्याचे सुरुवातीला स्पष्ट झाले होते. मात्र, तपासाअंती मयताचा आरोपी नुजाहिय शेख याच्या वडिलांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हे कृत्य केल्याचे आरोपींनी कबूल केले आहे.

गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार झाले होते. सांगली पोलीस अधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, अति. कार्यभार शहर विभाग, व पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेची दोन विशेष पथके तयार करण्यात आली होती.

दिनांक ७ जून २०२५ रोजी पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, पोहेकॉ. संदिप पाटील, पोथी. संतोष गळये, पो.कॉ. गौतम कांबळे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी हे इनाम वामणी येथे विठ्ठल पाटील कॉलेजजवळ येणार असल्याचे समजले. पोलिसांनी सापळा रचून पुलाखाली लपून बसलेल्या आरोपींना पकडले. ते पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांचा पाठलाग करून अटक करण्यात आली.

दोघा आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील तपास सुरू असून, तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा करीत आहेत.

Post a Comment

0 Comments