गोंदिया- तिरोडा तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी येथे दप्तरमुक्त शाळा उपक्रमांतर्गत आज दि. 26 जुलै ला शालेय मंत्रीमंडळ निवडणूक* घेण्यात आली.
लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे निवडणूक होय. तसेच सध्यस्थितीत ईव्हीएम मशीनने मतदान प्रक्रिया पार पाडली जाते. या सगळ्या बाबींची ओळख व्हावी व अनुभव विद्यार्थिनींना यावा यासाठी ईव्हीएम मशीन अप द्वारे आजची निवडणूक घेण्यात आली.
सदर निवडणूक पार पाडण्यासाठी विद्यार्थिनींनी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी भूमिका पार पाडली. यात प्रणाली गोवर्धन अलोने हिने केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहिले. सायना राजू नंदागवळी हिने मतदान अधिकारी मानसी अनिल तिरपुडे हिने मतदान अधिकारी, जानवी विकास चौधरी ह मतदान अधिकारी म्हणून काम पार पाडले. तसेच सुरक्षारक्षक म्हणून संचिता संजय फुलझेले .प्रज्ञा विश्वजीत रोडगे यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली.
निवडणूक पश्चात निकाल घोषित करण्यात आला व शाळा नायिका म्हणून सिमरन राजू नंदागवळी वर्ग 10 व शाळा उपनायिका म्हणून दिव्या सासवंतकुमार मारबदे वर्ग 9 ह्या निवडून आल्यात. ईव्हीएमच्या माध्यमातून मत नोंदवताना ह्या नवीन अनुभवामुळे मुलींना आनंद झाला.
ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी मेंढे मुख्याध्यापक यांनी मार्गदर्शन केले. निवडणूक निरीक्षक म्हणून पी. एम.घरडे शिक्षिका , ढवळे शिक्षक यानी कार्य पार पाडले. तसेच उंदीरवाडे शिक्षिका कौंडलकर शिक्षक , कामडी शिक्षक, बर्वे शिक्षक, चौधरी शिक्षक , राठोड शिक्षिका यांनी सहकार्य केले.
0 Comments