Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

"क्रिसेन्ट इंग्लिश स्कूल, तिरोडा येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा"

 गोंदिया, तिरोडा : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील क्रिसेन्ट इंग्लिश स्कूलमध्ये तान्हा पोळा उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शेतकरी पोशाख परिधान करून हातात नंदी घेऊन शाळेत हजेरी लावली.

या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने पोळ्याचे महत्त्व, बैलांबद्दलची कृतज्ञता आणि आपल्या संस्कृती-परंपरेशी असलेले नाते याचे दर्शन घडवले. छोट्या शेतकऱ्यांच्या वेशभूषेत मुलांनी नंदी सजवून आणल्याने शाळेचा परिसर उत्साहात न्हाऊन निघाला.

या कार्यक्रमाला शाळेचे संचालक गुप्ता, प्राचार्य व्ही. एस. पटले, उपप्राचार्य अंजनकर यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंपरेचे जतन करण्याबरोबरच भावी पिढ्यांमध्ये सांस्कृतिक जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments