गोंदिया :-जिल्हातील तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा गावातील फागुदास विठुले यांची शेतामध्ये बैल जोडी गवत खात होती . आकाशातुन अचानक मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस सुरू झाला त्यातच दुपारी १२ वाजेच्या दरम्यान आकाशातून वीज कडाडुन एका बैलाच्या अंगावर पडल्याने शेतातच बैलाचा मृत्यू झाला. तर एक बैल थोडक्यात बचावला. मृत झालेल्या बैलाची अंदाजे किंमत 50 हजार च्या जवळपास असल्याचे बोलले जात आहे. याच शेतात काही अंतरावरच धान पिकाची काम करत असलेल्या महिला देखील होत्या .त्या देखील थोडक्यात बचावल्या घटनेची माहिती होताच. गावातील ग्रामसेवक सचिन कुठे ,तलाठी बि.पटले, पोलीस पाटील मुन्नालाल शेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली, भेट घेऊन घटनेचा पंचनामा करण्यात आला .

0 Comments