Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

मिरजेत खुशीवन अपार्टमेंट दुर्घटनेत आणखी एका मजुराचा मृत्यू; मृतांची संख्या दोनवर

 मिरज शहरातील किल्ला भागात गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर सुरू असलेल्या खुशीवन अपार्टमेंटच्या बांधकामस्थळी 26 ऑक्टोबर रोजी झालेल्या दुर्घटनेत आणखी एका मजुराचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या आता दोनवर पोहोचली आहे.

या दुर्घटनेत तळघराचे काम सुरू असताना सिमेंट ब्लॉकची भिंत कोसळली होती. त्यात कर्नाटकातील भीमाप्पा मित्तलगे यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर सात ते आठ मजूर गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी कर्नाटकचा केदारी रायप्पा लिंगनुरे (वय 35, रा. सुट्टी) हा मजूर उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल होता. मात्र, उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला.

या अपघातानंतर बांधकामस्थळी मजुरांच्या सुरक्षेची कोणतीही योग्य व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अपार्टमेंटचे मालक व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments