सांगली शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सांगलवाडी शेतामध्ये एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना समजताच सांगली शहर पोलीस ठाणे तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले.
मयत व्यक्तीचे नाव परशुराम राजाराम पवार (वय ५०, रा. ज्योतिबा मंदिर, सांगलीवाडी) असे असून, सकाळी ते शेतात गेले होते. काही वेळानंतर परिसरातील नागरिकांना शेतामध्ये गळफास घेतल्याचे दिसून आले. तातडीने याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
घटनास्थळी पोलीस व रेस्क्यू फोर्सने पंचनामा करून मृतदेह सांगली शासकीय रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
या प्रकरणाचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत.

0 Comments