गोंदिया : तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार तथा जिल्हा अध्यक्ष चरण वाघमारे तसेच युवा नेते रविकांत बोपचे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 31 ऑगस्ट ला झरारिया सभागृहात संपन्न झाली.
या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभा निवडणुकीतील मतांची चोरी व पुढील काळात मतचोरी रोखण्यासाठी करावयाची कार्यवाही, स्थानिक प्रश्न आणि पक्ष संघटन बळकट करण्याचे धोरण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत पक्षाचे शरदचंद्र पवार यांच्या शिव - शाहू - फुले - आंबेडकर विचारांवर व पक्षाच्या ध्येयधोरणावर विश्वास ठेवत उषा रविंद्र शामकुल यांनी पक्षात प्रवेश केला. प्रासंगिक माजी खासदार खुशालचंद्र बोपचे साहेब, माजी आमदार चरणभाऊ वाघमारे तसेच युवा नेते रविकांत बोपचे यांनी पक्षाचा दुपट्टा घालून विधिवत प्रवेश दिला.
बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पक्षावरील निष्ठा दाखवून दिली. संघटन मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी तालुका अध्यक्ष कैलाश पटले, विधानसभा अध्यक्ष ओमप्रकाश रहांगडाले, तालुका कार्याध्यक्ष नासिर घाणीवाला, सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष युवराज शहारे, महिला तालुका अध्यक्षा भाग्यश्री केळवतकर, शहर कार्यवाह अध्यक्ष आशिष येरपुडे, डॉक्टर सेल अध्यक्ष एम. डी. पटले, मोहाडी तालुका अध्यक्ष हंसराज आगाशे, शहर कार्याध्यक्ष रजनीकांत शरणागत यांच्यासह भोजराज उईके, उमाशंकर पटले, नंदूभाऊ उके, सरपंच रवींद्र भगत, छाया टेकाम, मंदा टेंभरे, उर्मिला पटले, रंजित वालदे, विश्वनाथ बिसेन, कोठीराम निशाणे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments