दि. ०८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सुनिल शिंदे याचा खून करून त्याचा मृतदेह तिसंगी-घाटनांद्रे रस्त्यालगत शेतात फेकण्यात आला होता. या घटनेनंतर सांगली जिल्हा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने तपास सुरू केला.
सखोल चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, वैयक्तिक वादातून सुनिल शिंदे याचा दगडाने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणातील तिसरा संशयित प्रभू तजगही फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक, सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचा मोठा सहभाग असून सांगली पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व जत विभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी या कार्यवाहीचे कौतुक केले आहे.

0 Comments