हुपरी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) – हुपरी कोल्हापूर रोडवरील माळी पेट्रोल पंपाजवळ आज एक भीषण अपघात घडला. कोल्हापूरहून हुपरी बाजारात आंबे विक्रीसाठी येणाऱ्या रिक्षाला (MH 09 CW 2871) भरधाव वेगाने येणाऱ्या बसने (MH 14 RT 2908) जोरदार धडक दिली.
ही घटना रंकाळा-हुपरी रोडवर घडली असून धडकेनंतर रिक्षा चक्काचूर झाली. या अपघातामध्ये रिक्षामधील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून, घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली.
अपघाताची माहिती मिळताच हुपरी पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने मदतकार्य राबवले व जखमींना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय, कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे.
सध्या अपघातस्थळी वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. हुपरी पोलीस अधिक तपास करत असून, बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
#हुपरीअपघात #कोल्हापूरबातमी #बसरिक्षाधडक #रिक्षाचक्काचूर #हुपरीरोडअपघात #मराठीबातमी #BreakingNewsMarathi
0 Comments