नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देताना ऑनलाइन 43 सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत,तक्रार निवारण देखील संगणकीय पद्धतीने नोंद घेणार ,नागरिक थेट संवाद मा आयुक्त यांच्याशी साधू शकणार आहेत --मा सत्यम गांधी आयुक्त भा प्र से
95 45 91 81 91 व्हाट्सअप्प नंबर वरून आपली तक्रार नोंदविता येणार , नाव ,पत्ता, व्हिडिओ ,फोटो व्दारे संपर्क साधून आपली तक्रार देता येणार आहे,
प्रशासन गतिमान,
कार्यालय कामकाज सुधारणा विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.मनपा क्षेत्रात सद्या मा मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र १००दिवस उपक्रम अंतर्गत मनपा क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
मा सत्यम गांधी आयुक्त भा प्र से यांच्या अध्यक्षतेखाली मा मुख्यमंत्री महोदय १०० दिवस उपक्रम अंतर्गत मनपा स्तरावरील उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी स्थायी समिती सभागृहांमध्ये सर्वाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत मनपा क्षेत्रात शंभर दिवस उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्याबाबत मा. आयुक्त यांनी आढावा घेऊन सर्वप्रमुख यांना शासनाने दिलेल्या मार्गदर्शनाचा आदेशानुसार पूर्तता करणे कामी वेळेत नियोजन करावे असा सूचना दिल्या आहेत.
४७ ऑनलाइन नागरी सेवा ,नागरिकाची अधिकारी यांची भेट व बैठक व्यवस्था,पिण्याचे पाणी इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ,मनपा कार्यालय ,कार्यालय परिसर स्वच्छता ,रेकॉर्ड अद्यावत करणे , जतन करणे ,इऑफिस,
नावीन्य उपक्रम राबविणे असे उपक्रम चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका वतीने नियोजन केले आहे,
अंतिम टप्पात आढावा घेऊन सूचना देण्यात आला आहेत, सर्व विभागणी आपले कार्यालय स्वच्छ व सुन्दर करण्याच्या दृष्टीने सर्व प्रयन्त केले आहेत, त्याच बरोबर कामकाज मध्ये सुधारणा आणि नागरिकांना सोयीं सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व तयारी केली आहे.
अति आयुक्त रविकांत अडसूळ यांनी मार्गदर्शन करून आपल्या कडील जबाबदारी वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयन्त करावे असे सूचित केले आहे.
उप आयुक्त विजया यादव नोडल अधिकारी म्हणून सदर नियोजनावर लक्ष केंद्रित केले आहे, या वेळी उप आयुक्त स्मूर्ती पाटील , शिल्पा दरेकर , मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनवे , मुख्य लेखापाल अभिजित मेगडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण ,सहा आयुक्त नकुल जकाते , आकाश डोईफोडे, अनिस मुल्ला,सचिन सांगावकर,कार्यकारी अभियंता चिंदानंद कुरणे ,अमर चव्हाण अभियंता मालमता अधीक्षक धनंजय हर्षद ,अग्निशमन अधिकारी सुनील माळी, डॉ वैभव पाटील ,डॉ रवींद्र ताटे ,सहा आयुक्त आस्थापना विनायक शिंदे सर्व विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थितीत होते ,
0 Comments