सांगली दि.१७:नॅशनल हेराल्ड प्रकरणात मालमत्ता जप्ती आणि मा. सोनियाजी गांधी व मा. राहूल गांधी व काँग्रेस नेते यांच्या विरुद्ध अमलबजावणी संचानलयाने कोर्टात (ईडी) सादर केलेल्या आरोपपत्रानंतर सांगली काँग्रेसने आज सांगलीत काँग्रेस भवनासमोर केंद्र सरकार व ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.
नॅशनल हेराल्ड वरील कारवाई रद्द झालीच पाहिजे, सोनिया अन राहूल गांधी यांच्या विरुद्धचे आरोपपत्र मागे घ्या, संविधान संरक्षण हेच देशाचे रक्षण, सूड नको न्याय हवा, बंद करा बंद करा सत्तेचा दुरुपयोग बंद करा अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र शासन व ईडी विरोधात काँग्रेस भवनासमोर जोरदार निदर्शने केली.
यावेळी बिपीन कदम म्हणाले, 'अहमदाबाद येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाचा धसका घेऊन पक्षाला आणि मा. सोनियाजी व मा. राहूलजी गांधी यांना बदनाम करण्यासाठी खोटे आरोप करुन केंद्र शासन विरोधी पक्षाची बदनामी करत आहे. हा अन्याय खपवून घेणार नाही . नॅशनल हेराल्ड हे काँग्रेस नेते व कार्यकर्ते यांच्या कष्टातून उभे राहिले असून तेथे भ्रष्टाचार होण्याचा प्रश्नच नाही.'
नॅशनल हेराल्ड वरील जप्तीची कारवाई रद्द करुन सोनिया गांधी व राहूल गांधी आणि काँग्रेस नेत्यांवरील कोर्टात आकसाने दाखल केलेले आरोपपत्र मागे घ्या या मागणीसाठी आज सांगलीत काँग्रेस भवनासमोर झालेल्या निदर्शनात बिपीन कदम,प्रा. एन.डी.बिरनाळे,अजित ढोले, सचिन चव्हाण, अल्ताफ पेंढारी, मौला वंटमुरे, सनी धोतरे, पैगंबर शेख, सुशांत गवळी, अभय मोरकाने, सुनिल मोहिते, सुनिल भिसे, प्रथमेश शेटे, दीक्षित भगत, सुरेश गायकवाड, श्रीकांत साठे, सुरेश गायकवाड, मनोज लांडगे,राजेंद्र कांबळे
व सांगली काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
0 Comments