Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

सांगलीत हज यात्रेकरूंकरिता वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन; २३ एप्रिल रोजी फुलबन हॉलमध्ये होणार कॅम्प


 

सांगली – सालाबादप्रमाणे यंदाही खिदमत हुज्जाज कमिटी, सांगली जिल्हा यांच्या वतीने हज यात्रेकरूंकरिता विशेष वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर २३ एप्रिल २०२५ रोजी सांगलीतील फुलबन हॉल येथे पार पडणार आहे.

या वर्षी सांगली जिल्ह्यातून एकूण ३१६ हज यात्रेकरू पवित्र भूमीत, म्हणजेच सऊदी अरेबियामध्ये हज यात्रा करण्यासाठी प्रस्थान ठेवणार आहेत. या यात्रेपूर्वी यात्रेकरूंची प्राथमिक आरोग्य तपासणी करून घेणे अत्यावश्यक असल्याने खिदमत हुज्जाज कमिटी आणि शासकीय रुग्णालय सांगलीचे अधिष्ठाता तसेच सिव्हिल सर्जन यांच्या संयुक्त विद्यमाने हे वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

शारीरिकदृष्ट्या ही यात्रा खूप कठीण असते, त्यामुळे प्रत्येक यात्रेकरूने आपल्या आरोग्याची योग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन खिदमत हुज्जाज कमिटी, सांगली जिल्हाचे अध्यक्ष हाजी मुनीरभाई आत्तार यांनी केले आहे.

या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत विविध तपासण्या केल्या जाणार असून, यात्रेकरूंना वैद्यकीय सल्लाही दिला जाणार आहे.

Post a Comment

0 Comments