Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

सडक अर्जुनीत नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी किचन साहित्य वाटप; आमदार बडोले यांच्या हस्ते शुभारंभ

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात आज एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किचन साहित्याचे वाटप करण्यात आले.

या शिबिराचे आयोजन सडक अर्जुनी येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने बांधकाम कामगारांनी सहभाग नोंदवला होता. शिबिराचे उद्घाटन आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते संपन्न झाले.

या वेळी बोलताना आमदार बडोले यांनी सांगितले की, 23, 24 आणि 25 एप्रिल या तीन दिवसांत हे किचन साहित्य वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि गोरेगाव या तीन तालुक्यांमधील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आहे.

ज्या कामगारांची नोंदणी बांधकाम विभागाकडे वैध स्वरूपात झाली आहे, अशा कामगारांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

शासनाच्या विविध योजना आणि सुविधा कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार बडोले सतत प्रयत्नशील असून, भविष्यात ज्या बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ मिळू शकला नाही, त्यांच्यासाठी नवीन नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.


Post a Comment

0 Comments