जलनिसरण विभाग यांच्याकडून पावसापूर्व ड्रेनेजसाठी करण्यात आलेल्या रस्त्यांच्या खुदाईचे काम पूर्ण करून मक्तेदारांकडून ते रस्ते पूर्ववत करून घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. यामध्ये कोणतीही हयगय किंवा दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
या बैठकीत कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे यांनी आजअखेर झालेल्या कामांची सविस्तर माहिती सादर केली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या अमृत २.० योजनेतून तसेच राज्य सरकारच्या निधीतून कुपवाड ड्रेनेज योजना सुरू असून सध्या सुमारे ४५% काम पूर्ण झाले आहे.
त्याचबरोबर बांधकाम विभागामार्फत जिल्हा नियोजन समिती, केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून मंजूर करण्यात आलेली कामे पुढील महिन्यात पूर्ण करावी लागणार आहेत. या कामांचा प्रगती अहवाल व अंमलबजावणी प्रक्रिया याबाबत आयुक्तांनी सविस्तर माहिती घेतली. आगामी काळात यावर विशेष लक्ष दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या आढावा बैठकीत संबंधित विभाग प्रमुख, अभियंते व प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0 Comments