ही घटना दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. आग लागल्याचे लक्षात येताच तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळातच घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सदर घटनेमुळे विभागात खळबळ उडाली असून, वाहन तपासणी व देखभाल कार्यावर तात्पुरता परिणाम झाला आहे. पोलिस आणि RTO प्रशासनाने आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
0 Comments