Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

मुदखेड भाजपच्या नेतृत्वात नवा उत्साह! दत्तू वाडीकर तालुकाध्यक्ष, रामसिंग चव्हाण शहराध्यक्ष

 

भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व मोहिमेअंतर्गत मुदखेड तालुकाध्यक्षपदी वाडी मुक्तापूर येथील कार्यकुशल सरपंच प्रतिनिधी दत्तू देशमुख वाडीकर, तर शहराध्यक्षपदी युवा नेते रामसिंग चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या नेतृत्वामुळे भाजपाच्या स्थानिक कार्यामध्ये नवचैतन्य निर्माण होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

या नियुक्तीची घोषणा मुदखेड शहरातील उमरी चौकात आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी केली. यावेळी कार्यक्रमस्थळी मध्यवर्ती बँकेचे संचालक गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर, भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड, सभापती संजयराव देशमुख, किशोर स्वामी, शामराव पाटील टेकाळे, भीमराव पाटील कल्याण, तसेच अनेक मान्यवर व भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमात फटाक्यांची आतिषबाजी करत नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दोन्ही नवोदित पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री लोकनेते खा. अशोकराव चव्हाण, आमदार ऍड. श्रीजया ताई चव्हाण व माजी आमदार अमिताताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केले, तर आभार प्रदर्शन मारोती पाटील शंखतीर्थकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी शहर व तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments