सांगली (प्रतिनिधी) – सांगली शहरात गॅस सिलेंडर रिफिलिंगचा एक अत्यंत धोकादायक आणि अवैध प्रकार उघडकीस आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार, पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गारगोटी चौकाजवळील माने गल्लीतील काळे प्लॉटवर धाड टाकली. तपासात समोर आले की, रिक्षा चालक मोहिद्दीन मोहीद याच्या भाड्याच्या खोलीमध्ये गॅस सिलेंडर रिफिलिंगचे अवैध काम सुरु होते.
या कारवाईत पोलिसांनी ४ गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक मोटर, नळी, मोजमाप यंत्र यासह इतर साहित्य जप्त केले आहे. पोलिस चौकशीत मोहिद्दीन याने कबुली दिली की हे साहित्य त्याचे नातेवाईक बाहेरील राज्यातून आणून देतात, व त्याचा वापर स्थानिक पातळीवर गॅस रिफिलिंगसाठी होतो.
या प्रकारामुळे परिसरात अग्निसुरक्षेचा मोठा धोका निर्माण झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. आणखी दोषींना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सविस्तर बातमी पहा
#सांगली #गॅससिलेंडररिफिलिंग #अवैधव्यवसाय #पोलिसधाड #BreakingNews #SangliCrime #IllegalGasRefilling #SafetyHazard #मराठीबातमी
0 Comments