मिरज रेल्वे स्थानकाच्या मुख्य गेटजवळील डाव्या बाजूस असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटना १८ एप्रिल रोजी उघडकीस आली असून मिरज लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
मृत इसमाचे वय अंदाजे ३५ ते ४० दरम्यान असून तो राहणारा फिरस्ता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेहाचे वर्णन खालीलप्रमाणे आहे:
-
शरीरयष्टी: सडपातळ
-
उंची: अंदाजे १६५ सें.मी.
-
चेहरा: उभट
-
केस: डोक्याचे व दाढीचे केस काळे व वाढलेले
-
वर्ण: सावळा
-
विशेष लक्षण: छातीच्या उजव्या बाजूस इंग्रजीमध्ये "D" हे अक्षर गोंदलेले
-
अंगावरील पोशाख: निळा-पांढरा हाफ टी-शर्ट, पांढरी पँट
-
उजव्या हातात पांढऱ्या धातूचा कडा
सदर मृतदेहाबाबत मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून रजिस्टर क्रमांक २२/२०२५ अन्वये कलम १९५ बीएनएस एस अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार बकल नंबर ३७ पसारे हे करीत असून कोणालाही वरील वर्णनाचा इसम हरवलेला असल्यास मिरज रेल्वे पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या (आपत्कालीन पथक) सदस्यांनी तत्काळ कारवाई करत मृतदेह शासकीय रुग्णालय मिरज येथे पुढील तपासासाठी हलवला. या पथकात कैलास वडर, आकाश कोलप, सदाशिव पेडेकर, अमीर नदाफ, महेश गव्हाणे व सागर जाधव यांचा समावेश होता.
0 Comments