जम्मू कश्मीरच्या पहलगाम भागात काल पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या भ्याड हल्ल्यात अनेक निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेचा गोंदिया जिल्ह्यात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
गोंदिया शहरातील उडान पुलाजवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे कॅण्डल लाइट मार्च आयोजित करण्यात आला. या वेळी मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहत शोकभावना व्यक्त करण्यात आल्या.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सर्वांनी हातात मेणबत्त्या घेऊन "अमरणाथ यात्रेतील श्रद्धाळू व पर्यटकांवर झालेला हल्ला देशासाठी लज्जास्पद आहे, दहशतवादाचा अंत होणे गरजेचे आहे" अशा घोषणा दिल्या.
राजेंद्र जैन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "दहशतवाद्यांचा कोणताही धर्म नसतो. अशा हल्ल्यांमुळे देशाच्या एकतेला धक्का पोहोचतो. केंद्र सरकारने ठोस पावले उचलून अशा प्रवृत्तींचा कायमचा नायनाट करावा."
0 Comments