Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

स्टेट बँकेसमोर दुचाकीची डिक्की फोडून एक लाखाची चोरी – राहुरीत भामट्यांचा धुमाकूळ!

 राहुरी शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान देत स्टेट बँकेसमोर दुचाकीची डिक्की फोडून एक लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवार दिनांक २८ मे रोजी दुपारी नगर-मनमाड महामार्गावर बाजार समिती शेजारील स्टेट बँक परिसरात घडली.

वाघाचा आखाडा (ता. राहुरी) येथील रहिवासी सचिन लक्ष्मण धसाळ हे कृषी विद्यापीठातून दोन लाख रुपये घेऊन आले होते. यातील एक लाख रुपये स्टेट बँकेत भरणा करण्यासाठी गेले असताना त्यांनी दुसरा एक लाख रुपये दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेला होता.

धसाळ बँकेत गेले असता, तीन भामट्यांनी संधी साधून डिक्कीतील रोख एक लाख रुपयांची रक्कम चोरून नेली. ही संपूर्ण घटना काही क्षणात घडली. यानंतर धसाळ यांनी राहुरी पोलीस ठाण्यात तीन अज्ञात भामट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

विशेष म्हणजे, या भामट्यांचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिसांकडून त्यांची ओळख पटवण्याचे आणि शोध घेण्याचे काम सुरु आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून स्टेट बँकेजवळील परिसरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढल्या असून, ही बाब गंभीर बनली आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे गस्ती वाढवण्याची आणि भामट्यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे.



Post a Comment

0 Comments