Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

खाडीपारच्या महिला सरपंचांचा उपसरपंचावर गंभीर आरोप; पत्रकार परिषदेत उघड केल्या बोगस बिलांच्या फाईल्स

सडक अर्जुनी तालुक्यातील खाडीपार गावाच्या महिला सरपंच संघमित्रा डोंगरे यांनी गंभीर आरोपांची मालिका करत उपसरपंच गजानन परशुरामकर यांच्यावर पत्रकार परिषदेत मोठे वक्तव्य केले.


संघमित्रा डोंगरे यांनी सांगितले की, "२०२३ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या सरपंच पदासाठी माझ्या इच्छेविरुद्ध गजानन परशुरामकर यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांमार्फत माझ्यावर दबाव आणून उमेदवारी लढवण्यास भाग पाडले. मी निवडूनही आले, पण निवडून आल्यानंतर गजानन परशुरामकर यांनी अडीच वर्षांत तुला खाली खेचेन असे सांगून दबाव टाकायला सुरुवात केली."

तसेच, डोंगरे यांनी दावा केला की, "मी सरपंच असतानाही उपसरपंच माझ्याकडून खोट्या विकासकामांच्या बिलांवर सह्या करून घेत होते. गावात एकच काम करत होते पण दोन-दोन बिलं काढायला सांगत होते." या प्रकारांबद्दल सडक अर्जुनी पंचायत समिती आणि तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

त्याचबरोबर, गेल्या पंधरा वर्षांत तीन वेगवेगळ्या सरपंचांवर गजानन परशुरामकर यांनी अविश्वास ठराव आणून त्यांना पदावरून हटवल्याचेही त्यांनी उघड केले. या पार्श्वभूमीवर गावात ग्रामसभा घेण्यात येणार असून, संपूर्ण गावकऱ्यांना गजानन परशुरामकर यांच्या कारभाराची माहिती मिळावी या उद्देशाने पत्रकार परिषद घेण्यात आल्याचे संघमित्रा डोंगरे यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत त्यांनी बोगस बिलांची उदाहरणं दाखवत दस्तऐवज माध्यमांसमोर मांडले, त्यामुळे आता पंचायत विभाग या प्रकरणात कोणती कार्यवाही करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments