Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

मिरजमध्ये ऑनलाईन कॅसिनो आणि मटक्याचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये संतापाची लाट

 मिरज शहर व परिसरात ड्रीम 36, गोल्ड विन, फेडरल, रॉयल किंग यांसारखे ऑनलाईन कॅसिनो गेम खुलेआम सुरू असून, या फिक्सिंग कॉम्प्युटर जुगाराच्या माध्यमातून गरीब कुटुंबांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे.

सध्या मिरज तालुक्यात जवळपास १५० ऑनलाईन कॅसिनो अड्डे सक्रिय असल्याचे समोर आले असून, हे अड्डे दिवस-रात्र सुरू असतात. याशिवाय, मटका जुगाराचे अड्डे देखील शहरात उघडपणे कार्यरत आहेत.

विशेष म्हणजे, १३ पाण्याच्या क्लबच्या नावाखाली अनेक ठिकाणी २४ तास चालणारे जुगार अड्डे सुरु आहेत. यामुळे मिरजमध्ये दोन नंबर धंद्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे आणि सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र राजकीय आणि गुन्हेगारी दबावाखाली त्यांना माघार घ्यावी लागते, हे अत्यंत दुर्दैवी वास्तव आहे.

या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन व स्थानिक आमदार हे निष्क्रिय असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मिरजकरांना न्याय मिळेल का? की हे धंदे अधिकच बळावणार? असा प्रश्न उपस्थित होतो.

Post a Comment

0 Comments