मिरज, दि. 13 मे 2025:
मिरजेतील प्रसिद्ध हॉटेल ओम गार्डनचे मालक प्रदीप यादव यांचे चिरंजीव सिध्दार्थ प्रदीप यादव (वय 22) हे दिनांक 13 मे 2025 रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले आहेत. त्यांच्या अचानक बेपत्ता होण्यामुळे संपूर्ण कुटुंबात चिंतेचे वातावरण आहे.
माहितीनुसार, सिध्दार्थ यादव हे काळ्या रंगाचा अर्धबाही टी-शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट परिधान करून होते. त्यांच्या उजव्या हातामध्ये स्टीलचा कंडा आहे. घरातून निघून जाताना ते मनात राग धरून गेले असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
सध्या सिध्दार्थ यांचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. या घटनेबाबत संबंधित पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. नागरिकांनी जर कुणाला सिध्दार्थ दिसल्यास कृपया तात्काळ खालील मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.
0 Comments