आज सांगली येथील विभागीय जातपडताळणी कार्यालयात ऑल इंडिया मुस्लिम ओ.बी.सी. ऑर्गनायझेशन, सांगली जिल्हा यांच्यावतीने जात पडताळणीचे दाखले त्वरित देण्यात यावेत यासाठी निवेदन देण्यात आले. हे निवेदन जातपडताळणी समितीच्या अध्यक्षा श्रीमती प्रतिभा इंगळे यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले.
संघटनेने मागणी केली की, अर्जदारांकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करू नये. तसेच शासनाने घालून दिलेल्या नियम व परिपत्रकानुसार दाखले देण्यात यावेत. चुकीचे, बोगस किंवा अन्यायकारकरित्या नकार दिलेले दाखले विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात टाकतात, त्यामुळे कार्यपद्धतीत पारदर्शकता ठेवावी, असा आग्रह संघटनेने धरला.
औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार जात वैधता प्रमाणपत्र कोणत्याही कारणाशिवाय आणि कधीही अर्ज करता येऊ शकते, याच निर्णयाच्या आधारे दाखले द्यावेत, अशीही महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली.
या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेमध्ये जातपडताळणी समितीच्या अध्यक्षा श्रीमती इंगळे यांनी सर्व दाखले लवकरात लवकर विना विलंब देण्याचे आश्वासन दिले आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची खात्री दिली.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष फिरोज पठाण, प्रदेश समन्वयक नासिर शरीकमसलत, मनपा क्षेत्र अध्यक्ष जाकीर शरीकमसलत, सांगली शहर अध्यक्ष सुहेल बलबंड, मनपा क्षेत्र कार्याध्यक्ष अकबर शेख, आसिफ अत्तार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments