Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

सांगलीतील सर्वात लांब भोबे गटाराच्या स्वच्छतेला सुरुवात; शेकडो प्लास्टिक बाटल्या बाहेर

 सांगली शहरातील सर्वात लांब, सुमारे साडेतीन किलोमीटरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज मार्गावरील भोबे गटाराच्या स्वच्छतेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचनेनुसार आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

उपायुक्त स्मृती पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्रामबाग मंदिर ते कोल्हापूर रोडदरम्यान पसरलेल्या या गटाराची साफसफाई सुरू झाली. ही स्वच्छता जेसीबी मशिनच्या साहाय्याने केली जात आहे.

मोहीमेच्या पहिल्याच दिवशी गटारीतून शेकडो प्लास्टिक बाटल्या, थर्माकोल आणि इतर घनकचरा बाहेर काढण्यात आला. प्लास्टिक कचऱ्यामुळे पावसाळ्यात गटारी तुंबतात आणि परिसरात दुर्गंधी व रोगराईचा धोका निर्माण होतो, हे लक्षात घेता महापालिकेने ही मोहीम तातडीने सुरू केली आहे.

स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी, धनंजय कांबळे, कोमल कुदळे, राजेंद्र गोंधळे आदी अधिकाऱ्यांनी यामध्ये सक्रीय सहभाग नोंदवला. पुढील तीन दिवसांत संपूर्ण भोबे गटाराची स्वच्छता पूर्ण केली जाणार आहे.

दरम्यान, नागरिकांनी घरगुती व प्लास्टिक कचरा थेट गटारीत न टाकता महापालिकेच्या घंटागाडीत देऊन सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त स्मृती पाटील यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments