Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

गोंदिया भाजप जिल्हाध्यक्षपदी सीता ताई राहांगडाले; पहिल्यांदाच महिलेला मिळाली जबाबदारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट

 राज्यात भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यलयाकडून नुकतीच जिल्हाध्यक्षांची नव्याने निवड करण्यात आली आहे. यामध्ये गोंदिया जिल्हाध्यक्षपदी सीता ताई राहांगडाले यांची निवड करण्यात आली असून, गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच या पदाची जबाबदारी महिलेला देण्यात आली आहे. त्यामुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजकीय क्षेत्रात आपली स्वतंत्र आणि बळकट ओळख निर्माण करणाऱ्या सीता ताई राहांगडाले या यापूर्वी गोंदिया जिल्हा परिषदेच्या सदस्या राहिल्या आहेत. तसेच त्या भाजपच्या जिल्हा महामंत्रीपदाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यांच्या अनुभवाची आणि कार्यक्षमतेची दखल घेत पक्षाकडून त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

माध्यमांशी बोलताना सीता ताईंनी सांगितले की, "जिल्ह्यात भाजप संघटना बळकट करण्यासोबतच सामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य देणार आहे." त्यांच्या निवडीच्या बातमीने भाजप कार्यलयात चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. महिला कार्यकर्त्यांनी स्मितहास्य, पुष्पगुच्छ आणि घोषणांमधून आनंद व्यक्त केला.

तसेच, यापूर्वी महिला जिल्हाध्यक्ष म्हणून तुमेश्वरी बघेले यांची निवड झाली होती. त्यामुळे आता दोन्ही प्रमुख पदांवर महिलांचा प्रभाव दिसून येतोय. भाजप नेत्या भावना कदम यांनी सांगितले की, "हे महिलांसाठी प्रेरणादायी पाऊल असून येत्या निवडणुकांमध्ये महिला आपली ताकद दाखवतील."

गोंदिया जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच महिलेला मिळालेली ही जबाबदारी केवळ गौरवाची नाही, तर महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू करणारी आहे.

Post a Comment

0 Comments