Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

"सत्तेची तहान लागली असली तरी... गढूळ पाणी पीत नाहीत! – सुप्रिया सुळेंवर संजय राऊतांचा घणाघात"

 राज्यात राजकीय हालचालींना वेग आला असताना शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सडेतोड वक्तव्य करत विरोधकांवर घणाघात केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील काही नेते भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव घेत भाजपकडे झुकलेल्या नेत्यांवर ताशेरे ओढले.

"सुप्रिया सुळे यांचं नाव तुम्ही वारंवार घेत आहात. काही नेत्यांना सत्तेची तहान नक्कीच लागली असेल. मात्र तहान लागली म्हणून कोणी गटारातलं गढूळ पाणी पीत नाही," अशा शब्दांत संजय राऊत यांनी बोचरा टोला लगावत भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली.

संजय राऊत यांनी पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकेची झोड उठवली. "मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सातत्याचं आणि परिश्रमाचं कौतुक केलं, ते स्वागतार्ह आहे. मात्र, केवळ कौतुक करून चालणार नाही, त्यांच्या गुणांचं अनुकरणही व्हायला हवं. संयम, सातत्य, परिश्रम या मूल्यांची जपणूक फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करावी," असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

राज्यातील सत्तांतराच्या चर्चांदरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. नव्या पिढीतील काही नेते कुठल्या सागरात उडी मारायची हे ठरवत असताना, तिथे आधीच अस्तित्वासाठी संघर्ष सुरु असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Post a Comment

0 Comments