सांगली | प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यात नकली सिगारेट विक्री करणाऱ्या रॅकेटवर पोलिसांनी मोठा धडक कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) दोन ठिकाणी छापे टाकून गोल्ड फ्लेक कंपनीच्या नकली सिगारेट्सचा मोठा साठा जप्त केला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. आय.टी.सी कंपनीकडून तपास अधिकार प्राप्त अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी सांगली व मिरज येथील दोन दुकानांवर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर नकली सिगारेटचा साठा हस्तगत केला.
● गुन्हा क्रमांक 01 - सांगली शहर, गणपती पेठ
सांगली येथील "श्री गजानन स्टोअर्स" या दुकानात नकली सिगारेट विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने छापा टाकला. दुकानदार बिरमा करमचंद गिडवाणी (वय 50) याच्याकडून नकली गोल्ड फ्लेक सिगारेट्सचा साठा सापडला. ITC कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून सिगारेट्स मूळ उत्पादन नसल्याचे स्पष्ट केले.
● गुन्हा क्रमांक 02 - मिरज शहर, सराफ कट्टा
दुसऱ्या कारवाईत "चौधरी ट्रेडर्स" या दुकानातून नकली सिगारेट विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने कारवाई केली. आरोपी मुजाहिद मेहबुब चौधरी (वय 38) याच्याकडून मोठ्या प्रमाणावर बनावट गोल्ड फ्लेक सिगारेट जप्त करण्यात आल्या. युनिक आयडी फेक असल्याचे निष्पन्न झाले.
दोन्ही आरोपींविरुद्ध कॉपीराइट व ट्रेडमार्क अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास अनुक्रमे सांगली व मिरज शहर पोलीस ठाणे करत आहेत.
0 Comments