Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

सांगलीत भरदिवसा रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निघृण खून; सहा हल्लेखोर दुचाकींवरून पसार

 🔴 सांगलीत थरारक खून!

रेकॉर्डवरील गुन्हेगारावर सहा जणांचा हल्ला – घटनास्थळी पोलिसांची धाव


सांगली, दि. १२ मे – शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीला बळ येत असल्याचे दृश्य मंगळवार बाजार परिसरात पाहायला मिळाले. आर्म अ‍ॅक्टसारखे गुन्हे दाखल असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार मुबारक असिउल्ला शाह (वय ४२, रा. प्रकाशनगर, अहिल्यानगर) याचा सहा जणांनी पाठलाग करत थरारक पद्धतीने धारदार शस्त्र व दगडाने ठेचून खून केला.

ही खळबळजनक घटना मंगळवार बाजार चौक ते नुमराह मशीदसमोर घडली. घटनेनंतर हल्लेखोरांनी दोन दुचाकींवरून पळ काढला असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मुबारक शाह याचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील असून, अनेक वर्षांपासून सांगलीत वास्तव्यास होते. मुबारक हा पत्नीसह प्रकाशनगरमध्ये राहत होता आणि त्याला एक मुलगी आहे. तो पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध खुनी हल्ला, आर्म अ‍ॅक्टसारखे गंभीर गुन्हे दाखल होते. अलीकडे तो 'स्क्रॅप' व्यवसायात गुंतला होता.

घटनेच्या दिवशी, सोमवारी दुपारी, मुबारक आणि काही इसमांमध्ये किरकोळ वाद झाला. त्याच वादाचे रुपांतर नंतर खुनात झाले.

मंगळवार बाजारजवळील छावा चौकात, मुबारक आणि त्याचा मित्र अझरुद्दीन मावा खाण्यास आले असताना, सहा जणांचा टोळकीने पाठलाग करत हल्ला केला. मुबारकवर धारदार शस्त्राने वार होताच तो पळून गेला. मात्र हल्लेखोरांनी नुमराह मशीदसमोर त्याला गाठून निर्घृणपणे ठेचले.

घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण स्वामी यांनी पथकासह धाव घेतली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलिस उपअधीक्षक विमला एम. यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली आणि पोलिसांना आवश्यक सूचना केल्या.

घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून, लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments