सांगली | विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एक मोठी कामगिरी पार पडली असून, दरोड्याच्या गुन्ह्यातील सहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक चेतन माने, पोउनि सुजाता मोपळे यांचे पथक तयार करण्यात आले होते.
गोपनीय माहितीच्या आधारे सदर पथकाने मिरा हौसिंग सोसायटीजवळील पडक्या अपार्टमेंटमध्ये सापळा रचला होता. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत सर्व आरोपींना ताब्यात घेतले.
चौकशी दरम्यान सर्व आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून एकूण ₹९२,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, सपोनि चेतन माने, पोउनि सुजाता मोपळे, पोहेकॉ संदीप साळुंखे, अमर मोहीते, बिरोबा नरळे, सपोफी चव्हाण, पोहेकॉ गायकवाड, चालक जावेद आत्तार, पोकॉ महमद मुलाणी, आर्यन देशिगकर, प्रशांत माळी, गणेश बामणे, योगेश पाटील व चालक दत्ता कांबळे यांचा सहभाग होता.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चेतन माने करत आहेत.
0 Comments