कुपवाड शहरातील बजरंग नगर परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक रहिवासी उमेश पाटील यांचा अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने निर्घृण खून केला.
ही घटना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपीने उमेश पाटील यांच्या मानेवर धारदार शस्त्राने गंभीर वार केले. या हल्ल्यात उमेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे.
या खुनामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हा खून कोणी केला? त्यामागे वैयक्तिक वाद आहे की इतर काही कारणं? याचा तपास कुपवाड पोलीस करत आहेत. पोलिसांनी काही संशयित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू आहे.
या घटनेमुळे बजरंग नगर परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे. नागरिकांनी रात्री घराबाहेर न पडण्याचा इशारा एकमेकांना दिला आहे.
0 Comments