राहुरी कृषी विद्यापीठ परिसरात आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. नगरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पो (क्रमांक TN 59 DX 3157) ने ब्रेक न लागल्यामुळे समोर उभी असलेली स्कुटी अॅक्टिवा (MH 14 LN 2809) ला जोरदार धडक दिली. या धडकेत अॅक्टिवावर बसलेली विद्यार्थिनी सुचिता अशोक आधाटे (वय 28, रा. पुणे) हिचा जागीच मृत्यू झाला.
सुचिता ही राहुरी कृषी विद्यापीठात कृषी विस्तार विषयाचे शिक्षण घेत होती. नुकतेच तिचे लग्न पार पडले होते आणि लग्नानंतर ती शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा विद्यापीठाच्या होस्टेलवर वास्तव्यास होती.
अपघातानंतर विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी डी. एन. जाधव व सुरक्षा गार्ड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी ॲम्बुलन्सची वाट न पाहता स्वतःच्या गाडीने तिला नगर येथील खाजगी रुग्णालयात नेले. मात्र डोक्याला जबर मार लागल्याने मेंदूवर गंभीर परिणाम झाला आणि उपचारापूर्वीच रस्त्यात तिचा मृत्यू झाला.
0 Comments