Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

तिरोडा येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांकडून पथनाट्य सादरीकरण

 गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पोलीस स्टेशन व मेरीटोरियस पब्लिक स्कूल, तिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त राणी अवंतीबाई चौक, तिरोडा येथे विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून अंमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम प्रभावीपणे मांडले गेले. "अंमली पदार्थाला नाही म्हणूया", "व्यसनमुक्त समाज घडवूया" यांसारख्या घोषणांनी परिसर दुमदुमला.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी हातात बॅनर, पोस्टर व स्लोगन्स घेऊन रैलीसदृश वातावरण निर्माण केले. नागरिकांनी देखील विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाला तिरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, मेरीटोरियस पब्लिक स्कूलचे संचालक मुकेश अग्रवाल, प्राचार्य प्रफुल्ल तिवारी, शिक्षक संजय परिहार, तसेच वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली असून, व्यसनमुक्त समाजाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments