मीरा साहेब दर्गा परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने पंजा स्थापना कार्यक्रम पार पडला. या धार्मिक कार्यक्रमासाठी हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. धार्मिक सौहार्दाचे उदाहरण ठरलेल्या या कार्यक्रमाने सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.
या कार्यक्रमावेळी दर्गा पटांगणात के. एस. एम. रिक्षा स्टॉप यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व धर्मीय बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेत आपल्या श्रद्धेची प्रचिती दिली.
या कार्यक्रमात विविध सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, स्थानिक रहिवासी आणि युवा वर्गाने उत्स्फूर्त सहभाग घेतला. शांतता, भक्तीभाव आणि बंधुभाव यांचे दर्शन घडवत या वर्षीचा पंजा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
0 Comments