शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा हातभार लागतो, याच भावना मनात ठेवून जमीयत दर्दमंद ईनजनीत संस्थेच्यावतीने मिरजेतील शाळा क्र. १७ सेमी इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात मुला-मुलींनी आनंदाने सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमावेळी संस्थेचे मौलाना मुबारक काझी, उपाध्यक्ष हाफिज अल्ताफ नाईकवाडी, सदस्य शकीलभाई शेख, इमरान भगवान, इनुसबाई चाबुकस्वार, खजिनदार हाफिज अहमद कच्ची, सेक्रेटरी हाफिज मोहम्मद अली शेख, तसेच अल्ताफ मुजावर हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका किस्मत जनाब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वह्यांची भेट मिळाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.
शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळाल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले असून, जमीअत दर्दमंद संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments