आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी चालत असलेल्या वारकऱ्यांची निसर्ग फाउंडेशन तर्फे गावातील महादेव मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले. ‘सेवेतूनच ईश्वरप्राप्ती’ या भावनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी लाभ घेतला.
या सेवाभावी उपक्रमामागे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांची प्रेरणा असून, त्यांच्या संकल्पनेतून “आरोग्य शिबीर हा सेवेचा आदर्श” हे ब्रीद घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वरी कंधारे व डॉ. सारिका कुंभार यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यवाह डॉ. विक्रमसिंह कदम, सहकार्यवाह फिरोज शेख, सल्लागार प्रा. संजय ठिगळे, सुनिल पाटील, डॉ. वैशाली हजारे, निवास कदम, नानासाहेब मंडलिक, नितीन चंदनशिवे, सोमनाथ मंडलिक, प्रमोद भोसले, सौरभ मंडलिक, सुरज मंडले, सुवर्णा मंडलिक, निखिल मंडलिक, अभि गायगवळे, भगवान जाधव, जीवन धेंडे यांचे मोलाचे योगदान लाभले.
यावेळी उपस्थित असलेल्या वैद्यकीय व सहाय्यक अधिकाऱ्यांमध्ये आरोग्य सहाय्यक कुंडलिक माळवे, आरोग्यसेवक महेश शिंगाडे, आरोग्यसेविका मनीषा मोरे, औषध निर्माण अधिकारी तृप्ती देठे, आरिफ मुलाणी, ज्योती जावीर तसेच निसर्ग फाउंडेशनचे पदाधिकारी व स्वयंसेवक यांनी सहभाग घेतला.
या आरोग्य शिबिराचे संयोजन संस्थेचे सचिव नानासाहेब मंडलिक यांनी प्रभावीपणे पार पाडले. वारकऱ्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत निसर्ग फाउंडेशनच्या सेवाभावाचे कौतुक केले.
0 Comments