खानापूर तालुक्यातील विटा शहरात सध्या हवामानात मोठे बदल झाले असून अवकाळी पावसाने दणका दिला आहे. या पार्श्वभूमीवर विटा नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
विटा नगरपालिका प्रशासक विक्रम बांदल व मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी नागरिकांसाठी महत्त्वाचे दिशानिर्देश जारी करत जनतेने खालील प्रमाणे दक्षता घ्यावी, असे स्पष्ट केले आहे. पावसाळ्यात साथरोगाचा धोका वाढतो त्यामुळे वेळेत खबरदारी घेणे गरजेचे आहे.
प्रशासनाने दिलेले महत्त्वाचे निर्देश:
-
पिण्यासाठी केवळ नगरपालिकेच्या नळाचे पाणीच वापरावे. खाजगी विहीर वा बोअरचे पाणी पिण्यास टाळावे.
-
पाण्याच्या टाक्या आठवड्यातून एकदा रिकाम्या करून स्वच्छ कराव्यात. मंगळवार 'कोरडा दिवस' म्हणून पाळावा.
-
टायर, भांडी, डबकीत पाणी साचू देऊ नये. यामध्ये डेंग्यू व मलेरियाचे डास वाढतात.
-
साथरोगाचे लक्षणे आढळल्यास त्वरित ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र विटा येथे संपर्क साधावा.
-
घर, परिसर स्वच्छ ठेवा. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा.
-
घनकचऱ्याचे वर्गीकरण करा - ओला, सुका, सॅनिटरी व घातक कचरा वेगळा करूनच घंटागाडीत द्यावा.
-
सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करा.
-
पालकांनी पाळीव प्राणी रस्त्यावर मोकाट सोडू नयेत, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल.
-
जुने कपडे, चप्पल, वापरण्याजोगे साहित्य गरजूंपर्यंत पोहोचवा.
"आपण सर्वांनी जबाबदारीने वागून स्वच्छ, सुरक्षित विटा घडवूया", असे आवाहन नगरपरिषद प्रशासक विक्रम बांदल व मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी केले आहे.
0 Comments