Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

सांगलीतील माय हुंडाई शोरूम फोडणारे चोरटे वलसाड येथे जेरबंद; एकाने केली गुन्ह्याची कबुली

 मौजे अंकली, ता. मिरज येथे असलेल्या मोहन ऑटो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या माय हुंडाई शोरूममध्ये झालेल्या घरफोडीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुजरात राज्यातील वलसाड येथून प्रमुख आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चौकशीत गुन्ह्याची कबुली मिळाली असून, आणखी चार साथीदारांवर शोध सुरु आहे.

दि. __ रोजी शोरूममधील केबिनच्या काचेच्या खिडकीतून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून गोदरेज कपाटातील लॉकर फोडले होते. सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ९ लाख ६८ हजार ९८३ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.

या घटनेची माहिती मिळताच मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

तांत्रिक तपासाअंती पोलीस पथकाने वलसाड (गुजरात) येथे छापा मारून दिनेश गजेंद्र मोहिते (वय २७) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचे साथीदार:

  1. मुरली मनोहर पवार, उमरगाव (वलसाड)

  2. करण परलाल मोहिते, मालेगाव (नाशिक)

  3. रोहित (पूर्ण नाव माहिती नाही), लयाछा (वापी, वलसाड)

  4. अक्षय (पूर्ण नाव माहिती नाही), लयाछा (वापी, वलसाड)
    यांच्यासह शोरूम फोडल्याचे कबूल केले.

दिनेश मोहिते हा वलसाडमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून गांजाची वाहतूक व घरफोडीप्रकरणी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी वलसाड न्यायालयाने त्याला १० वर्षांची शिक्षा सुनावली होती, त्यात त्याने ५ वर्षे कारावास भोगला आहे.

सध्या त्याला सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरु असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments